माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजे मायरा वायकुळने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. यात ती हुबेहुब अभिनेत्री अमृता खानविलकरप्रमाणे नाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे मायराने अगदी अमृताप्रमाणेच साडी नेसली आहे. तसेच हा डान्स करताना तिच्या चेहऱ्यावरील हावभावही फार बोलके असल्याचे दिसत आहे.
व्हिडीओ शेअर करताना तिने ‘चंद्रा’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओवर अमृता खानविलकरनेही कमेंट केली आहे. ‘माझी गोंडस… माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मायरा’, असे कमेंट तिने केली आहे. त्यावर मायराने ‘धन्यवाद…’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
हे सुध्दा वाचा..Wild life… मला एक ग्लास देता का? कांगारू पोहोचला थेट ‘बार’मध्ये… व्हिडिओ






