जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करा…संतोष यादव
अहमदनगर: देशव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज अहमदनगर च्या वतीने शहराचे आमदार मा श्री संग्रामभैय्या जगताप यांना सविस्तरपणे संपातील मागण्याचे निवेदन देण्यात आले.
केंद्रीय संघटनेच्या आहावनानुसार दोन दिवसीय संप अहमदनगर विभागात दुसऱ्या दिवशीही यशस्वी करण्यात आला.
आज संघटनेचे नेते श्री संतोष यादव व श्री प्रदिप सूर्यवंशी यांनी शहराचे आमदार मा श्री संग्रामभैया जगताप यांची भेट घेत मागण्याविषयी सविस्तरपणे चर्चा करून, मागणीपत्रातील अतिशय महत्वाचा व कामगारांविषयी अतिशय जिव्हाळाचा विषय जुनी पेन्शन सर्वाकरिता लागू करा,सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविषयी सविस्तरपणे चर्चा केली व याविषयी जेष्ठ नेते मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशी चर्चा करण्याची विनंती मा आमदार साहेबाना करत याविषयी सकारात्मक मार्ग काढण्याची विनंती केली.
मागणीपत्राचे निवेदन जेष्ठ नेते मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब व मा सौ सुप्रियाताई सुळे यांना पाठविण्यात आले. मा संग्रामभैय्या जगताप यांनी सांगितले की, या विषयी निश्चित सकारात्मक प्रयत्न केले जातील.
यावेळी संघटनेचे नेते मा श्री संदीप कोकाटे,कमलेश मिरगणे,श्री प्रदीप सूर्यवंशी, श्री अनिल धनावत यांचे सह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.






