Sunday, May 19, 2024

डान्सबार चालवताना नवाब मलिक बांग्लादेशातून मुली आणून वेश्या व्यवसाय चालवायचे

भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी मलिक यांच्यावर एक धक्कादायक आरोप केलाय. नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे असं मोहित कंबोज म्हणालेत. मलिक यांनी बांगलादेशी मुलींना भारतात आणून त्यांना वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याचा दावाही कंबोज यांनी केलाय.

मोहित कंबोज यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक आरोप केले आहेत. आम्ही अनेक मुलींची स्टिंग ऑप्रेशन्स केली असून त्यामध्ये मुलींनी नवाब मलिकांनी आपल्याला जबरदस्तीने वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याची कबुली दिलीय. हे पुरावे आपण लवकरच तपास यंत्रणांकडे देणार असल्याचं कंबोज म्हणाले आहेत. कंबोज यांनी मलिक यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. कुर्ल्यात लोक घाबरायचे या गोष्ट बोलायला..एक मंत्री ड्रग्जमध्ये, वेश्या व्यवसायात सामील आहे, त्याच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध अससल्याचा आरोप,, बेनामी आणि भ्रष्टाचारी संपत्ती आहे…हे भयंकर आहे.. आजच्या आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles