Sunday, May 19, 2024

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी नगर शहरात वसतिगृह आणि अभ्यासिका

उपमहापौर गणेश भोसले यांनी केले बैठकीचे आयोजन

नगर : मराठा समाजातील आर्थिक दुर्बल गरीब विद्यार्थ्यांसाठी शहरात लवकर एक असे वसतिगृह आणि अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नालेगाव येथील महापालिकेची रिकामी जागा सकल मराठा समाज अहमदनगर या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सदर जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपमहापौर गणेश भोसले यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
सकल मराठा समाज संस्थेस नालेगाव येथील सर्वे नंबर २२० २२१ मधील रिकामी जागा हस्तांतरित करण्याबाबतचा ठराव ११/६/२०२१ रोजी महापालिकेत मंजूर करण्यात आला होता. तथापि या जागेच्या हस्तांतरण प्रक्रियेबाबत अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी, कार्यांनी यासंदर्भात आमदार संग्राम जगताप व उपमहापौर गणेश भोसले यांच्याकडे सदर मुद्दा मांडला उपमहापौर भोसले यांनी त्यांच्या दालनात समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते जागा हस्तांतरणातील त्रुटी सविस्तर चर्चा केली. नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार वैभव जोशी व जितेंद्र सासवडकर यांना पातळीवर येणाया अडचणी दूर करून जागा तातडीने सकल मराठा समाजाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या बैठकील मराठा समाजाचे डॉ. अविनाश मोरे, अनिकेत चेमटे, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक बाळासाहेब पवार,अॅड. शिवजीत डोके, संजय पाटील, दिपक लांडगे आदी उपस्थित होते.
सकल मराठा समाज स्वनिधीतून उभारणार वसतिगृहाची वास्तू
आरक्षण व विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने काही वर्षापूर्वी राज्यभर मोर्चे काढले होते. त्या काळात अहमदनगर सकल मराठा समाजाला मोठा निधी जमा झाला आहे.या निधीचा वापर समाजातील गोरगरीब, आर्थिक दुर्ब हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजाने महापालिकेकडे जागेची मागणी केली होती. त्याबाबतचा ठरावही महापालिकेने मंजूर केलेला आहे. सदर जागा समाजाकडे हस्तांतरित झाल्यानंतर स्वनिधीतून तेथे अभ्यासिका उभारण्यात येणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles