Tuesday, May 21, 2024

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला ॲसिड टाकून मारण्याची धमकी, नगरमधील प्रकार

नगर : दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला अ‍ॅसिड टाकून संपविण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याबाबत पत्नीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश आनंद वाघचौरे (रा. डॉक्टर कॉलनी, सिव्हील हॉस्पिटल, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी सुरेखा निलेश वाघचौरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवार, 27 फेब्रुवारी रोजी दुपारी फिर्यादीच्या राहत्या घरी ही घटना घडली. आरोपी निलेश वाघचौरे फिर्यादी सुरेखा वाघचौरे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. त्यांनी पैसे न दिल्याने आरोपी शिवीगाळ करून तुझ्या नोकरीचा रुबाब मला दाखवू नको, मी तुला अ‍ॅसिड टाकून संपवून टाकील अशी धमकी दिली.
तसेच लोखंडी गजाने मारहाण देखील केली. फिर्यादीच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles