नगर: नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटाचा देशभरात बोलबाला होत आहे. अनेक दिग्गजांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. आमदार रोहित पवार यांनीही मंजुळे यांचें कौतुक करीत आपण स्वतः चित्रपट गृहात जाऊन हा सिनेमा पाहणार असल्याचं सांगितलं आहे.
आ.पवार यांचे ट्विट…
‘फँड्री’ व ‘सैराट’च्या यशानंतर Nagraj Popatrao Manjule जी यांनी अमिताभ बच्चन साहेबांसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण केलंय! झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या फुटबॉल टिमवर आधारित त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट समाजातील जातीभेदावर प्रकाश टाकतो.
मी चित्रपट गृहात जाऊन #Jhundthemovie बघणार!
तुम्हीही बघा!