Saturday, May 18, 2024

नालेगाव सीना नदीच्या नाल्यांमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

नगर – शहरातील नालेगाव परिसरामध्ये सीना नदीच्या नाल्यांमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली .
अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नगर शहरामध्ये नालेगाव परिसरात असलेल्या नाल्यामध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका व्यक्तीला मृतदेह आढळून आला. त्यानंतर तात्काळ याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केल्यानंतर या ठिकाणी पाणी ज्या ठिकाणी सोडतो त्या नाल्यामध्ये हा मृतदेह पडलेला आढळून आला.

या मृतदेहाच्या अंगावर पांढरे कपडे व जीन पॅन्ट असून त्याचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्ष आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तो जिल्हा रुग्णालयांमध्ये नेला. या संदर्भामध्ये कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles