Sunday, May 19, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतिन यांच्या बरोबर चर्चा, दिला महत्त्वपूर्ण सल्ला

रशिया आणि यूक्रेनमधील संघर्ष अधिक तीव्र झालाय. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती पुतिन यांनी यूक्रेनबाबत सध्यस्थितीच्या घटनाक्रमांची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली. सोबतच पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि नाटो गटातील मतभेद केवळ चर्चेतूनच सोडवले जाऊ शकतात हा दृढविश्वासाचा पुनरुच्चार केल्याची माहितीही पीएमओने दिलीय. तसंच पंतप्रधान मोदी यांनी हा हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन केलं आणि सर्व बाजूंनी राजनैतिक संवाद आणि चर्चेतूनच तोडगा काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी चर्चेचून तोडगा काढण्याचं आवाहन करण्यासोबतच यूक्रेनमधील भारतीय नागरिक, खास करुन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत असलेल्या चिंतेविषयी पुतिन यांना माहिती दिली. तसंच भारत त्यांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपपणे भारतात परत आणण्यास प्राधान्य देत असल्याचं मोदींनी सांगितलं. तसंच यावेळी दोन्ही नेत्यांनी मान्य केलं की त्यांचे अधिकारी आणि मुत्सद्दी गट सामयिक हिताच्या मुद्द्यावर एकमेकांशी नियमित संपर्कात असतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles