Saturday, May 18, 2024

मंत्री आदित्य ठाकरेंंसह राठोड, कळमकर प्रचारासाठी थेट उत्तर प्रदेशात

नगर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार दिले असून आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशात प्रचारासाठी गेले आहेत. शिवसेनेचे प्रवक्त खा.संजय राउत त्यांच्याबरोबर आहेत. नगर शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या या प्रचार दौर्‍यात नगरमधील युवा सेनेचे विक्रम राठोड व माजी महापौर अभिषेक कळमकर यांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
UP SS22
आदित्य ठाकरे यांनी स्वत: या युवा शिलेदारांना सोबत नेले आहे. काही दिवसांपूर्वीच सोनई येथे आदित्य ठाकरेंनी राठोड व कळमकर या युवा शिलेदारांचा आवर्जून उल्लेख केला होता. त्यापाठोपाठ आता दोघांनाही थेट उत्तर प्रदेशच्या रणांगणात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडून येत्या काळात राठोड तसेच कळमकर यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची चर्चा आहे.
up kalamkar

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles