Monday, May 20, 2024

मधुमेहींसाठी महत्त्वाचे…साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ भाज्या आहेत बहुगुणी

मधुमेह हा रक्तातील साखरेच्या उच्च पातळीशी संबंधित आजार आहे. या आजाराचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत ज्यात टाइप १ आणि टाइप २ मधुमेहाचा समावेश आहे. टाईप २ मधुमेह खूप सामान्य आहे, ज्यामध्ये स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करत नाही. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते.

पालक
पालक हे फोलेट, आहारातील फायबर, जीवनसत्त्वे A, B, C, E आणि K चा उत्तम स्रोत आहे. फायबर पचनास विलंब करते, ज्यामुळे साखरेचे चयापचय लवकर होत नाही आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारते.

कारले
कारली आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्याच बरोबर त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्याचा तुम्ही तुमच्या आहारात सहज समावेश करू शकता. कारल्यामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, जे त्याच्या रक्तातील साखर कमी करण्याच्या प्रभावासाठी ओळखले जाते,

फुलकोबी
फुलकोबी हे आवश्यक खनिजे आणि पोषक तत्वांचे भांडार आहे. सुपरफूडमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज देखील असतात. फुलकोबीमध्ये ५ ते १५ च्या दरम्यान जीआय असते, जे मधुमेह असलेल्या लोकांसाठी चांगले मानले जाते. फुलकोबीमध्ये उच्च फायबर देखील असते जे रक्तातील साखरेतील चढ-उतार रोखण्यासाठी फायदेशीर आहे.

ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये भरपूर पोषक असतात. अहवालानुसार, ब्रोकोलीचे जीआय १५ आहे, जे खूप कमी आहे. हा फायबरचा एक अपवादात्मक स्त्रोत आहे, ज्यामुळे ते मधुमेहासाठी चांगले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles