महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षकांचा राष्ट्रीय आयटीसी पुरस्काराने सन्मान

0
281

शालेय शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पुणे, उस्मानाबाद, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ६ शिक्षकांना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते राष्ट्रीय आयसीटीपुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आयसीटीपुरस्कार मध्ये पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक नागनाथ विभुते (जांभूळधरा) व मृणाल गांजळे (पिंपळगावतर्फे म्हाळुंगे), तसेच उमेश खोसे (जगदंबानगर,जि.उस्मानाबाद), आनंदा अनीमवाड (मल्यानराठी,पालघर), प्रकाश चव्हाण (करंजवन,जि.नाशिक), शफी शेख (बिटरगाव, यवतमाळ) यांचा समावेश आहे.