शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत, खोट्या शपथपत्रा प्रकरणी चौकशीचे आदेश

0
670

औरंगाबाद: शिवसेना नेते व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नोटरी अ‍ॅड. एस. के. ढाकरे यांच्याशी संगणमत करून सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून दोन पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीत नामनिर्देशनपत्र दाखल करताना मालमत्ता खरेदीच्या संदर्भाने शपथपत्रात खोटी माहिती सादर केली.त्यामुळे या प्रकरणात दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करणारा फौजदारी अर्ज सिल्लोड न्यायालयात दाखल झाला.

सुनावणी प्रसंगी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मिनाक्षी धनराज यांनी याप्रकरणी सिल्लोड पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी महेश शंकरलाल शंकरपेल्ली व डॉ. अभिषेक सुभाष हरिदास यांनी फौजदारी अर्ज दाखल केला आहे.
सिल्लोड न्यायालयाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सिल्लोड पोलिसांना दिले आहेत.