Thursday, May 2, 2024

अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या दिवशी ‘इतक्या’अर्जाची विक्री….१ नामनिर्देशनपत्र दाखल

अहमदनगर दि. १९ :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अनुषंगाने ३७- अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास काल १८ मार्च पासून सुरूवात झाली आहे. काल व आज दोन्ही दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले नाही. आज १९ एप्रिल, २०२४ रोजी २० जणांना ४३ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले.
सार्वजनिक सुट्यांचे दिवस वगळता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार २५ एप्रिल, २०२४ अशी असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, अहमदनगर यांनी दिली आहे.

शिर्डी, दि.१९ एप्रिल २०२४ – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात शुक्रवार, १९ एप्रिल २०२४ रोजी १ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. आजच्या दिवशी १९ व्यक्तींनी ३५ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे १९ एप्रिल रोजी दाखल नामनिर्देशनपत्रे – भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles