मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे या योजनेमध्ये बोगस लाभार्थीचे रॅकेट समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी परराज्यातील बोगस लाभार्थींचे रॅकेट असल्याची माहिती उघड झाली आहे.
लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार केले आणि त्याद्वारे तब्बल ११७१ अर्ज दाखल केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हे बोगस लाभार्थी महाराष्ट्रातील नाही तर उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील आहेत. या बोगस लाभार्थींनी ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील रहिवासी असल्याचे दाखवले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू झाली होती .या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सात हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली असून एका लाभार्थी महिलेला 10 हजार 500 रुपयांची रक्कम मिळाली आहे . दरम्यान लाडकी बहीण योजनेत बोगस अर्ज वाढले असून लातूर सांगली जिल्ह्याच्या नावाने लॉगिन आयडी बनवून परराज्यातील लाभार्थ्यांचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे . राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे लॉगिन आयडी बनवून तब्बल 1171 अर्ज लाडकी बहीणमध्ये झाल्याचे समोर आले आहे . म्हणजेच 12,295,500 एवढी रक्कम या खात्यांमध्ये जमा झाली . यारजान पैकी 22 अर्ज हे एकट्या बार्शी तालुक्यातील आहेत. केवळ दोन लॉगिन वरून 1171 अर्ज दाखल झाले आहेत .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे रॅकेट समोर आले .लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवत केवळ दोन लॉगिन वरून वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांच्या नावाखाली 1171 अर्ज दाखल झाले .अर्ज दाखल केलेल्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील रहिवासी असल्याचा दाखवण्यात आलं आहे .परंतु प्रत्यक्षात मात्र हे भामटे उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधील असल्याचं पोलीस महसूल व महिला बाल विभागाच्या तपासात पुढे आले .






