शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष निवड झाल्याबद्दल संपत बारस्कर यांचा सत्कार संपन्न
शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेची समृद्धी आणि संवर्धन करण्याचे काम होत आहे- संपत बारस्कर
अहिल्यानगर : शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेची समृद्धी आणि संवर्धन करण्याचे काम होत आहे, वाचनाचे आणि भाषेचे संस्कार साहित्य संमेलनातून घडत असतात. जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांसह मान्यवरांना १६ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात सामावून घेण्यात येईल आणि साहित्यिकांचा आनंद द्विगुणित होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, आत्तापर्यंत झालेल्या संमेलनाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम १६ व्या संमेलनातून होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, माझ्या सारख्या युवकाला शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होण्याचा मान साहित्यिकांनी दिला, वाचन संस्कृती पुढे घेऊन जाण्यासाठी साहित्य संमेलन भरवणे ही काळाची गरज आहे, या माध्यमातून युवा साहित्यिक निर्माण होतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा १६ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले.
शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष निवड झाल्याबद्दल संपत बारस्कर यांचा सावेडी येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते,यावेळी शब्दगंधचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, शाहीर अरुण आहेर, संस्थापक सचिव सुनील गोसावी,सुभाष सोनवणे, प्रा डॉ तुकाराम गोंदकर, नवजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, बबनराव गिरी, प्रा.डॉ.अनिल गर्जे, कवयित्री शर्मिला गोसावी, राजेंद्र चोभे, प्रा.डॉ.रमेश अबदार, हर्षल आगळे, संदीप गोसावी,प्रसाद भडके, ऋषिकेश राऊत, ऋता ठाकूर, सुरेखा घोलप, हर्षल गिरी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना बारस्कर म्हणाले की, नगर जिल्ह्याला साहित्याची मोठी परंपरा आहे,या परंपरेत भर घालण्याचे काम आजच्या पिढीच साहित्य करत आहे. साहित्यिकांचा मान सन्मान करणे, त्यांना लिहिते करणे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य असून त्या दृष्टिकोनातून शब्दगंध संमेलनात चांगले काम आपण करू. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये काव्यसंमेलन, लोक जागर साहित्य यात्रा, साहित्य दिंडी,शाहिरी जलसा, उद्घाटन समारंभ, एकपात्री प्रयोग, दोन काव्य संमेलन, परिसंवाद चर्चासत्र, कथाकथन, मराठी, हिंदी, उर्दू गजल संमेलन, पुरस्कार वितरण व समारोप समारंभ होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांशी या माध्यमातून संपर्क करण्यात येत आहे. साहित्याची आवड असणाऱ्या रसिकांनी ८ आणि ९ फेब्रुवारी ही तारीख या कार्यक्रमासाठी राखीव ठेवावी. असे आवाहनही त्यांनी केले
अनेक मान्यवर उपस्थित होते.
शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, राज्य संघटक प्रा डॉ अशोक कानडे,कोपरगाव तालुका शाखेच्या अध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, शेवगवचे हरिभाऊ नजन, पाथर्डीचे डॉ. राजकुमार घुले, नेवासाचे प्रा. डॉ किशोर धनवटे यांनी अभिनंदन केले आहे.






