Mayra video
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील छोट्या परीनं देखील मनसोक्त पावसाचा आनंद घेतला. परीनं पहिल्या पावसात भिजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
परी म्हणजेच मायरा शुटींग आटोपून घरी जात असताना रात्री पावसानं मुंबईत हजेरी लावली. मायरा गाडीतून घरी जाताना पहिल्या पावसाचा आनंद घेत घरी गेली. मायराच्या सोशल मीडियावर तिचा पावसाचा आनंद घेत असतानाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ज्यात परी गाडीत उभे राहून शांतपणे पावासाकडे बघत पहिल्या पावसाचा आनंद घेत आहे.