KBC Question
‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या, हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या प्रोमोमध्ये चुकीची बातमी देणाऱ्या न्यूज चॅनेलना अमिताभ यांनी टोला लगावल्याचे दिसून येते. प्रोमोच्या सुरुवातीला अमिताभ हॉट सीटवरील स्पर्धकाला प्रश्न विचारतात की, यापैकी कशात जीपीएस ट्रॅकर आहे. अर्थातच, या प्रश्नासाठी ४ ऑप्शन देण्यात आले आहेत. त्यामध्ये, पहिला पर्याय होता A) टाइपरायटर, B) दूरदर्शन, C) satelite, D) २ हजार रुपयांची नोट.
अमिताभ यांच्या प्रश्नावर महिला स्पर्धक गुड्डी यांनी मोठ्या आत्मविश्वासाने २ हजारची हे D ऑप्शनचे उत्तर दिले. मात्र, हे उत्तर चुकीचे ठरले. त्यावर अमिताभ बच्चन गुड्डी यांना म्हणतात की, तुमचे उत्तर चुकीचे आहे. त्यावेळी, गुड्डी यांनी वृत्तवाहिनीवर पाहिलेल्या व्हिडिओची आठवण सांगितली. त्यानंतर अमिताभ बच्चनही गडबडून गेले. मात्र, त्यांनी लगेचच त्या चुकीच्या बातमीने नुकसान तुमचे झाले, असे म्हणत गुड्डीला उत्तर दिले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.