झी मराठीच्या मंचावर प्रेक्षकांना नेहमी प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर होत असतात. यंदाही स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ‘उंच माझा झोका’ या नेत्रदीपक सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या कार्यक्रमाच्या निवदेनाची धुरा भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर सांभाळणार आहे. त्यातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. नुकतंच झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात त्यांनी एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पंकजा मुंडेंनी अगोदर जिन्स घातल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्यांनी मराठमोळा साज करत साडी नेसल्याचे पाहायला मिळत आहे.






