पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने पोस्ट केलेला एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
सोमवारी गौरीसह पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. त्यामुळे सगळीकडे विसर्जनाची तयारी सुरू झाली होती. अशाच एका विसर्जन सोहळ्याला सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या परिवारासह उपस्थित होता. तेव्हाचा व्हिडीओ देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विसर्जन मिरवणूक असलेल्या ठिकाणी अल्लू अर्जुन त्याच्या गाडीमधून पोहचताना दिसतोय. त्याच्यासह त्यांची मुलगी आरहा असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.






