urmila matondkar‘ती मी नव्हेच’…उर्मिला मातोंडकर करणार दमदार पुनरागमन

0
299

urmila matondkarबॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिच्या मेहनतीच्या जोरावर उत्तम स्थान निर्माण केले आहे. तिने तिच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपटात काम केले आहे. त्याचप्रमाणे ‘माधुरी, ‘आजोबा’ अशा मराठी चित्रोटांमध्येही ती झळकली. आता पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.परितोष पेंटर यांच्या लेखनीतून उतरलेल्या ‘ती मी नव्हेच’ या चित्रपटात उर्मिला महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात तिच्याबरोबर श्रेयस तळपदे, निनिद कामत या कलाकारांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटामुळे हिंदी कलाविश्व गाजवणारे हे तीन कलाकार प्रथमच मराठीमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.