अभिनेत्री प्राजक्ता माळी राजकारणात जाणार का अशा चर्चा नेहमीच होत असतात. आता या चर्चांना पुन्हा एकदा उधाण येणार असं दिसत आहे.
त्याच कारणही तितकंच खास आहे. प्राजक्ता माळीनं पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ही खास भेट होती.राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्राजक्ता माळी थेट शिवतीर्थावर पोहोचली. राज ठाकरेंच्या वाढदिवसाठी तिनं खास पोस्ट लिहिली आहे.राज ठाकरे यांना पुष्पगुच्छ देत प्राजक्तानं त्यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटो पोस्ट करत प्राजक्तानं लिहिलंय,”महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, मा. श्री. राजसाहेबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा”.”इथून पुढील सर्वच वर्ष, खासकरून हे वर्ष आपल्या आयूष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरो”. प्राजक्ताकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा घेताना राज ठाकरे देखील आनंदी दिसले.राज ठाकरे एक राजकारणी असले तरी ते एक कलाप्रेमी आहेत म्हणून मला ते आवडतात असं प्राजक्तानं अनेकदा म्हटलं आहे. प्राजक्ता मनसेमध्ये प्रवेश घेणार का? असाही प्रश्न तिचे चाहते तिला नेहमी विचारत असतात.