जामखेड तालुक्यातील खर्डा गाव मोठ्या लोकसंख्येचे आणि मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. येथील ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी मतदारसंघाच्या सर्वच नेत्यांचा नेहमी प्रयत्न असतो. मात्र, खर्डा ग्रामपंचायतीत 17 पैकी 10 सदस्यांचे बहुमत असताना आणि भाजपकडे 7 सदस्य असताना महिनाभरापूर्वी सरपंचपद निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा एक सदस्य फोडत 9 विरुद्ध 8 असा विजय मिळवत रोहित पवारांना पहिला धक्का दिला होता.आता खर्डा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीतही रोहित पवार गटाचे 9 मधील दोन ग्रामपंचायत सदस्य फुटले आणि याही वेळी पराभवाचा पाढा कायम राहत राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव जमकावळे यांचा पराभव झाला.
आमदार शिंदे गटाच्या शीतल सुग्रीव भोसले यांना 10 मते मिळवत उपसरपंचपदी निवडून आल्या.