मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. या फोटोत ती कुटुंबाबरोबर निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने लिहिलं ‘निसर्ग तुम्हाला प्रफुल्लित करतो, पण कुटुंबासोबत निसर्गाचा आनंद घेणे यापेक्षा चांगली थेरपी दुसरी कुठलीच नाही.’ फोटोमध्ये प्राजक्ता पाण्याचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. कुटंबाबरोबरचे आनंदाचे घालवलेले क्षण प्राक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्राजक्ताने नुकतच खरेदी केलेल्या तिच्या कर्जतच्या फार्महाऊसच जवळचे हे फोटो आहेत.