व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा घाण पाण्यात पडलेल्या तिरंगा बाहेर काढण्यासाठी नाल्यात उतरल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ जिंदगी गुलजार है नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये शाळेचा गणवेश घातलेला मुलगा तिरंग्याची शान वाचवण्यासाठी नाल्यात उतरतो आणि घाण पाण्यात पडलेले सर्व ध्वज बाहेर काढतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी या मुलाचे मनापासून कौतुक करत आहेत. शिवाय त्याच्या या कृतीने अनेकांची मन जिंकल्याचं दिसत आहे.