ब्युटी क्वीन, स्वर्गाची अन् माझ्या हृदयाची… प्राजक्ता माळीला नेमकं कोणी केलं प्रपोज?

0
26

लाखो तरूणांची क्रश असलेली प्राजक्ता माळी कायमच सोशल मीडियावर आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. कधी आपल्या हटक्या फोटो पोजमुळे तर कधी तिच्या फोटोंच्या कॅप्शनमुळे अभिनेत्री चर्चेत असते. अभिनेत्री, होस्ट अशा अनेक विविध जबाबदाऱ्या संभाळणारी प्राजु यावेळी आपल्या फोटोमुळे आणि त्यावर आलेल्या कमेंटमुळे ती चर्चेत आहे.
प्राजक्ता कायमच हटक्या स्टाईलमुळे आणि विविध फॅशनमुळे ती चर्चेत असते. नुकतंच अभिनेत्रीने ब्लॅक कलरच्या ब्लेझरमध्ये अभिनेत्री दिसली आहे. तिने त्या आऊटफिटवर एक हटके फोटोशूट केलं आहे. तिच्या त्या आऊटफिटवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या अभिनेत्रीच्या कमेंटवर तिला आलेल्या एका प्रपोजची तुफान चर्चा होतेय. प्राजक्ताला एक चाहता प्रपोज करत म्हणतो, ‘ब्युटी क्वीन, स्वर्गाची आणि माझ्या हृदयाची आणि आत्मा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. प्राजू या ड्रेसमध्ये सुंदर आणि गोंडस दिसत आहे. माझं व्हॅलेंटाईन हार्ट’ असं म्हणत तिच्या चाहत्याने तिला प्रपोज केलं आहे. सध्या अभिनेत्रीच्या पोस्टवर आलेल्या या कमेंटची तुफान चर्चा होते.

प्राजक्ताच्या पोस्टवर अनेकांनी तर गाण्यांचीच रिघ लावली आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर एक चाहता कमेंट करत म्हणतो, उफ्फ माय डियर क्रश, तर आणखी एक युजर म्हणतो, खूपच गोड दिसते माझी नट्टू राणी, तर आणखी एक युजर म्हणतो, ओह कोई तोह रोखलो… अशा अनेक भन्नाट कमेंट्स अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत. प्राजक्ताच्या या नव्या फोटोंवर ३२ हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे तर हजारो चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स देखील केल्या आहेत.