सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ एका कुटुंबाचा आहे, ज्यात आई आणि तिची दोन मुले जेवायला बसली आहेत. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, आईची दोन्ही मुलं जेवायला तर बसली आहेत, पण त्यांचं सगळं लक्ष हे फक्त त्यांच्या मोबाईलमध्ये आहे. आणि हे कदाचित आई आधीच बघते आणि त्यांच्या समोर जेवण वाढण्यासाठी कढई आणि टोप घेऊन येते व मुलांच्या पुढ्यात ठेवते. पण, मजेशीर गोष्ट अशी की, आई जेवण वाढायला भांडी तर आणते, पण त्या भांड्यांमध्ये जेवण नसून मोबाईल आणि इयरफोन्स असतात. आई तिच्या दोन्ही मुलांच्या ताटात चमच्याने एक एक मोबाईल आणि इयरफोन त्यांचं जेवण म्हणून वाढते; जे बघून तिची मुलेही चकित होतात. हे बघून तुम्हीही पोट धरून हसाल. जेवताना मोबाईल बघणाऱ्या मुलांची आई कशी गंमत करते एकदा व्हिडीओतून बघाच…