video:नगरमध्ये मराठा समाज आक्रमक! राजकीय नेत्यांचे बोर्ड फाडले

0
1168

अहमदनगर -राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा परत एकदा चांगलाच पेटला आहे. सरकारला ४० दिवस देऊनही अजून ठोस असा निर्णय मिळाला नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा नव्याने अंदोलन, प्रचार चालू झाले आहेत.
याच दरम्यान नागरमध्येही सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. नगरमध्ये शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राजकीय नेत्यांचे फाडले बोर्ड फाडण्यात आले आहे. नगरजवळील एका मंगल कार्यालयात आज (रविवार) प्राथमिक शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरू होते. या वेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते आले व्यासपिठावर चढले. यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. अखेर राजकीय नेत्यांचे बोर्डा फाडून आंदोलनकर्त निघून गेले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा अवधी दिला होता. काल हा वेळ संपला तरी देखील सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. यामुळे जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यातील अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तसंच जागोजागी मोर्चे, आंदोलने, उपोषणे, रॅली काढून जरांगे यांना समर्थन देण्यात येत आहे.