अजित पवारांनी सहाच महिन्यात अमोल मिटकरींना पदावरून हटवले…

0
16

समाज माध्यमातून वेगवेगळी वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांचं पक्षाने मुख्य प्रवक्ते पद काढून घेण्याची कारवाई केली आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र सहाच महिन्यात त्यांना पदावरून काढण्यात आल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांच्या जागेवर उमेश पाटील यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

. त्यांच्या काही वक्तव्यामुळे बरेचदा वाद ही होतात. सत्तेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी भाजपवर अनेकवेळा तोंडसुख घेतले होते. त्यामुळे याची चर्चा सत्तेत सहभागी झाल्यानंतर झाली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा आमदार मिटकरी यांना सत्तेत सहभागी झाल्यानंतर देखील विरोध कायम होता.