सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. अन् या व्हिडीओमध्ये पान मसाल्यात काचेचा वापर केल्याचा दावा केलाय. गुटख्यात तंबाजन्य पदार्थ असतात. पण प्रश्न असा आहे खरंच ५ रुपयांच्या गुटख्यात काच देखील असते का?
व्हिडीओ shakti_ke_experiment या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका तरुणाला पान मसाल्यावर विविध प्रकारचे प्रयोग करताना पाहू शकता. त्यानं सर्वात आधी पाकिट फोडून पान मसाला एका ग्लासात ओतला. मग त्याम त्यामध्ये पाणी मिक्स केलं. हे पाणी गाळून घेतलं. त्यानंतर हे गाळलेलं पाणी एका टिशू पेपरवर ओतलं. मग हा टिशू पेपर पाण्यात भिजवला. आणि हे पाणी पुन्हा एकदा गाळलं असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा पदार्थ सापडला. हा पदार्थ काचेच्या भूग्यापासून तयार होत असल्याचा दाव या तरुणानं केला आहे. हा व्हिडीओ १४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.






