मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (यांनी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेश हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे मला कोणी जा असे सांगितले नाही. आजपर्यंत मी प्रामाणिकपणे काम केले असून पुढेही भाजपच्या माध्यमातून करेल. आज पुन्हा एकदा नव्या राजकीय आयष्याची नवी सुरुवात करत आहे.भाजप देईल ते काम करायला मी तयार आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे
काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपपध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर उपेक्षेप्रमाणे त्यांनी आज भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय, आपला वैयक्तिक निर्णय असून काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर टीका किंवा आरोप करण्याचं त्यांनी टाळलं आहे.
काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. त्यासाठी खूप विचार केला. काही गोष्टी चांगल्या होत आहेत तर त्यात आपला पण वाटा हवा ही भावना आहे. काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिलं तसच मी पण पक्षासाठी खुप काही योगदान दिलं आहे. अचानक माझ्यावर काही आरोप करत असेल तर ते बरोबर नसल्याचं ते म्हणाले.