स्व.अनिल राठोडांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार.. सुजय विखेंची उमेदवारी जाहीर होताच किरण काळे आक्रमक

0
21

स्व. अनिलभैय्या राठोडांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार – किरण काळे ;

प्रतिनिधी : शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून “स्व. अनिलभैय्या राठोडांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार” अशी पोस्ट केली आहे. नगर दक्षिणेतून सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर काळे यांनी ही पोस्ट केली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला अनिल राठोड यांच्या विरोधात सुजय विखे यांनी केलेल्या कामाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस नगर शहरात सज्ज असल्याचा संदेश दिला आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीचे सर्मथक आमने सामने येत काळे यांच्या फेसबुक वॉल वरून एकमेकांना विरोध करताना पाहायला मिळत आहेत. आता हीच वेळ आली आहे गद्दारीचा बदला प्रत्येक शिवसैनिक घेणार म्हणजे घेणारच. आम्ही तर वाटच बघत होतो बदला घ्यायची. हीच खरी माननीय आमदार अनिलभैय्यांना श्रध्दांजली आसणार, असे महाविकास आघाडीचे समर्थक म्हणत आहेत.

किरण काळे यांना विचारले असता ते म्हणाले, देशात भाजप विरोधात लाट आहे. नगर दक्षिणेत यावेळी परिवर्तन अटळ आहे. विधिमंडळ काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षांच्या काळात नगर शहरात काँग्रेसने उत्तम प्रकारे पक्ष संघटन मजबूत केले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी थोरात यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेचा खासदार महाविकास आघाडीचाच होणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. विशेषत: नगर शहरात ज्यांनी जननायक स्व. अनिलभैय्या राठोड यांच्याशी गद्दारी केली त्यांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते जीवाचं रान करणार असल्याच सांगत काळे यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांना थेट आव्हान दिले आहे.