Thursday, May 16, 2024

मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यावर दगडफेक; डोकं फुटून रक्तबंबाळ

मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेल्या अमोल खुणे यांच्यावर दगडफेक झाली आहे. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील गढी ते माजलगाव रोडवर घडलीये. दगडफेकीत अमोल खुणे यांच्या डोक्याला मार लागला असून ते रक्तबंबाळ झालेत.

सदर घटनेनंतर उपस्थित व्यक्तींनी त्यांना तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आता या ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव जमला असून तलवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील काही वेळात या ठिकाणी जबाब घेण्यासाठी दाखल होणार आहेत.

अमोल खुणे हे गेवराई येथून आपल्या गावी रुई धानोरा येथे निघाले होते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. दरम्यान हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला? हे अद्याप समोर आले नसून पोलीस तपासातच हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles