अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना पराभूत करून मोठा विजय मिळवला आहे.निकालानंतर माध्यमांशी बोलताना निलेश लंके यांनी महाविद्यालय आघाडीच्या नेत्याचे आभार मानले. तसेच त्यांनी स्व.अनिल राठोड यांची आवर्जून आठवण काढली. आज माझ्या पेक्षाही जास्ती आनंद अनिल राठोड यांना झाला असता अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.






