काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून दु:ख होते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. या व्हिडीओमध्ये एक तरुण भररस्त्यावर एका मुलीला प्रपोज करतो पण पुढे असे काही होते की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या मुलाबरोबर नेमके काय घडले? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण भररस्त्यावर एका मुलीसमोर गुडघे टेकवून तिला प्रपोज करतो.त्याच्या हातात अंगठीचा बॉक्स असतो पण मुलगी काहीच प्रतिक्रिया देत नाही आणि तेथून धावत पळत जाते. मुलीला पळताना पाहून तरुणाला कळते की तिचे उत्तर नाही तेव्हा तो खाली बसतो आणि ढसा ढसा रडतो. ही घटना पाहून कोणीही भावूक होईल. तिथे आजुबाजूला उभे असलेले व बसलेले लोक त्या तरुणाजवळ येतात आणि त्याला धीर देतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या तरुणाबरोबर जे घडले, त्याविषयी दु:ख वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.