नगर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटात गेलेले पारनेरचे तत्कालिन आमदार व विद्यमान खासदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीवेळी अजितदादांची साथ सोडत शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीच्या प्रचारावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेरमध्ये सभा घेवून लंके यांचा समाचारही घेतला. परंतु, लंके यांनी त्यावेळी अजितदादांना प्रत्युत्तर देणे टाळले होते. आता अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त खा.लंके यांनी अजितदादांसमवेतचा फोटो शेअर करीत शुभेच्छा दिल्या आहेत..
https://x.com/INilesh_Lanke/status/1815264160130695669