निवडणुकीच्या विजयामध्ये शिवसैनिकांचा मोठा वाटा -आ. संग्राम जगताप
शिवसेनेच्या वतीने आ. संग्राम जगताप यांचा सत्कार
नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे चांगले सहकार्य मिळाले. शिवसैनिकांनी चांगली कामगिरी बजावली असून, विजयामध्ये शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रासह जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना मोठे यश मिळाले. मोठ्या संख्येने उमेदवार निवडून आले. शहर मतदारसंघात काम करताना महायुतीच्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन सामाजिक प्रश्न व राजकीय भूमिका एकत्रितपणे घेणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. तर शिवसैनिकांनी खांद्याला खांदा लावून केलेल्या कामाबद्दल आभार मानले.
नगर शहर विधानसभा मतदार संघात मताधिक्याने निवडून आल्याबद्दल महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शहर प्रमुख सचिन जाधव, भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे, अनिल लोखंडे, रवींद्र लालबोंद्रे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, आकाश कातोरे, अभिषेक भोसले, युवा सेनेचे शहर प्रमुख महेश लोंढे, अमोल हुंबे, पोपट पाथरे, आशिष शिंदे, विनोद शिरसाठ, सुनील भिंगारदिवे, अविनाश भिंगारदिवे, ओंकार शिंदे, महिला आघाडीच्या पुष्पाताई येलवंडे, तृप्ती साळवे, बहुले ताई, सलोनी शिंदे, विराज जाधव, रोहित पाथरकर, पांडुरंग घोरपडे, अक्षय कोंडवार, प्रथमेश बाचकर, सचिन गायकवाड, तात्या रासकर, सागर काळे ओमकार थोरात, बापू मोरे, सचिन राऊत आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन जाधव म्हणाले की, आ. जगताप यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी मनापासून कार्य केले. प्रत्येक प्रभागातून व प्रत्येक परिसरात शिवसैनिकांनी या विजयासाठी खारीचा वाटा उचलला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जिल्ह्यात शिवसैनिकांनी अहोरात्र परिश्रम घेतले. सर्वांनी केलेल्या कष्टाचे हे फळ आहे. जगताप यांना शहरात मोठे मताधिक्य मिळाले, त्यांना मंत्रिपद मिळावे ही नगरकरांची व शिवसैनिकांची इच्छा असल्याचे सांगितले. तर त्यांच्या मोठ्या सन्मान सोहळ्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.






