सध्या राज सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यातच विधानपरिषदेच्या सभापतीच्या निवडीचा मुहूर्त पार पडणार आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. तर, सभापती पद रिक्त आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या सभापतींची देखील लवकरच निवड केली जाणार आहे. भाजपकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. विधानपरिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे, भाजपकडून सकाळी राम शिंदे अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. त्यामुळे, भाजपकडून राम शिंदे यांचं पुनर्वसन करण्यात येत असल्याचे दिसून येते. स्वतः राम शिंदे यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकून उमेदवारीसाठी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले.






