नवी मुंबई : नेरुळ येथील एका संस्थेत नोकरी मिळवून देण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला चांगलाच चोप दिलाय. नोकरीसाठी एका गरजू महिलेने अर्ज केला होता. या नोकरीच्या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने या असाह्य महिलेकडे शरीरसुख देण्याची मागणी केली होती. या नराधमाने पीडित महिलेला वारंवार फोन करून दबाव टाकून माझी पत्नी नसल्याने नोकरीच्या बदल्यात शरीरसुख देण्याची मागणी केली. तसेच या पीडित महिलेला स्विय सहाय्यक म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून वाशी येथील लॉजमध्ये बोलवले. यावेळी हा नराधम लॉज मध्ये आला असता मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला रंगेहाथ पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.