Saturday, May 18, 2024

नगर जिल्ह्यात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी…९ नगरपालिकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

नगर: राज्यातील 208 नगरपालिकांतील सदस्यांचा कार्यकाळ मार्च 2022 पर्यंत संपत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या नगरपालिकांचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे.
नगर जिल्ह्यातील ९ नगर पालिकांची मुदत संपत आली होती. शिर्डी नगरपंचायतची नगरपरिषद झाली असल्याने त्यांची निवडणूक लवकरच होणार आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे.

या नऊ पालिकांत कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी व देवळाली प्रवरा यांचा समावेश आहे. यातील कोपरगाव, पाथर्डी, राहाता व देवळाली प्रवरा या चार नगरपालिकांवर भाजपचे वर्चस्व आहे. तर उर्वरित नगरपालिकांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. संगमनेर नगरपालिका काँग्रेसच्या, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव व राहुरी या नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles