‘ती’ दुसऱ्याशी लग्न करीत असल्याने तरूण भडकला….नवरदेवाची गाडीच फोडली..व्हिडिओ

0
66

व्हिडीओ officialpathaan_with_shorts_ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही तरुणाला पाहू शकता जो गाडीची तोडफोड करत आहे. त्यानं सर्वात आधी एक स्कूटी उचलून गाडीच्या बोनटवर फेकली. आणि मग मोठमोठे दगड उचलून गाडीच्या काचा फोडल्या. सुदैवानं या गाडीमध्ये कोणाही बसलेले नाही. त्यामुळे कोणाला दुखापत झाली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार ही घटना हरियाणामधील रोहतक या ठिकाणी घडली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २ कोटी १३ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या तरुणाच्या प्रेयसीचं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत होतेय. म्हणे त्याला प्रेमात धोका मिळाला. त्यामुळे नाराज असलेला हा प्रियकर तरुणीच्या वरातीत शिरला आणि त्यानं थेट गाडीची तोडफोड केली. अक्षरश: दगड उचलून काचा फोडल्या.