धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करण्याची मागणी…संतोष देशमुख कुटुंबिय उच्च न्यायालयात

0
68

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत २१ दिवस उलटूनही मुख्य आरोपी पकडले गेलेले नाहीत. यानंतर आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करण्याची मागणी केली आहे. वकील शोमितकुमार सोळंके यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वाल्मिक कराड यांच्यावर कलम ३०२ आणि मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि धनंजय मुंडे यांना तपास होईपर्यंत मंत्रिपदापासून दूर करा, अशी मागमी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.