सध्या गावावरील प्रेम दाखवणारे एक गाणं सध्या चांगलेच चर्चेत आहे. “काय सांगू राणी मला गाव सुटना” हे लोकप्रिय गाणं तुम्ही ऐकलंच असेल. सध्या या गाण्याची एका वेगळ्याच कारणाने जोरदार चर्चा सुरू आहे. एका तरुणाने या गाण्याचा अप्रतिम रॅप लिहिलाय. सध्या या रॅपचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल जो “काय सांगू राणी मला गाव सुटना” या लोकप्रिय गाण्याचं रॅप व्हर्जन म्हणताना दिसतोय. हे रॅप व्हर्जन पाहून कोणीही थक्क होईल. खूप सुंदररित्या तो रॅप सादर करतो. तुम्हाला हा रॅप पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटेल. हा तरुण गावातील वेगवेगळ्या ठिकाणी हा रॅप म्हणताना दिसतो.






