अहमदनगर – रुग्णालय भाडेतत्त्वावर घेऊन त्याबद्दल दिलेली एक कोटींची अनामत रक्कम परत न करता कुसुमुक केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी गणेश सर्जेराव फसले यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगर मनमाड रोड वरील आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल भाडेतत्त्वावर घेतले होते. त्यासाठी एक कोटी लाख दरमहा भाडे व एक कोटी रुपये अनामत रक्कम धनादेशाद्वारे दिली त्यानंतर एप्रिल 2024 मध्ये फसले यांनी रुग्णालय चालवणे शक्य नसल्याचे कळवले व अनामत रकमेतून भाडे वजा करून उर्वरित रक्कम द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली परंतु अनामत रक्कम परत न करता फसवणूक करण्यात आली. त्यानंतर 21 मार्च रोजी फसले हे रुग्णालयात पाहण्यासाठी गेले असता त्यांना दमदाटी करण्यात आले संबंधितावर कडक कायदेशीर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात डॉक्टर अनिल यांच्या विरोधी वरून गुन्हा दाखल केला आहे त्या संदर्भात आम्हीही तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार केली परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न करता अदाखलपत्र पुन्हा नोंदवून घेतला असल्याचे फसले आणि निवेदनात म्हटले आहे