Saturday, April 27, 2024

मनोज जरांगे पाटलांनी मागवला गावागावातून अहवाल,जरांगे निवडणूक लढविणार

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुक लढणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आंदोलनकाळापासून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंनी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. दरम्यान आज जरांगे यांनी, राजकारण आपला विषय नाही, मात्र समाजाची इच्छा आहे म्हणून लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. उद्या गावागावातून येणाऱ्या अहवाला बाबत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्यांच ते म्हणाले आहेत. मराठ्याच्या उमेदवारीचा कोणाला फायदा होतो आणि कुणाला तोटा होतो हे सगळं उद्या क्लियर होईल. मायबाप समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
काही तरुण सोशल मीडियावर स्वयंघोषित उमेदवारीचा निर्णय घेत आहेत. या त्या तरुणांच्या भावना आहेत. त्यांना सरकार विषयी चीड आहे. सरकारने त्यांची फसवणूक केली म्हणून हे तरुण राजकारणात पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र समाज ठरवेल तो अंतिम निर्णय राहील. गावागावातून आलेल्या अहवालानंतर अंतिम निर्णय होईल आणि तोच निर्णय सर्वांना लागू असेल.
काहीजण उमेदवाराच्या नावाखाली वर्गणी जमा करत आहेत. त्याची अजिबात गरज नाही, निवडणुकी एक रुपयाही लागणार नाहीये, त्यामुळे असली दुकानं कोणीही सुरू करू नयेत. त्यांनी असं केलं असेल तर त्यांनी ते परत करावं नाहीत मीडियासमोर वाजवल्या शिवाय राहणार नाही असा सज्जड दम वर्गणी जमा करणाऱ्या कार्यकर्त्यांना जरांगेंनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles