प्रिय व्यक्ती विशेष करून आई किंवा वडील गेल्यानंतर मुले, मुली व जवळच्या व्यक्ती आवडती सवय , आवडता पदार्थ सोडण्याचा संकल्प करतात, मात्र कर्जत तालुक्यातील कोंभळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गांगर्डे यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर स्वतःच्या मृत्यू पश्चात देहदानचा संकल्प केला आहे.
तसेच डॉ गांगर्डे यांच्या कुटुंबियांनी वडिलांच्या निधनानंतर पाचव्या दिवशी पिंड दान विधी केला आहे, गांगर्डे कुटुंबीयांचा समाजाला मार्गदर्शक असा हा उपक्रम आहे.
पुर्वी दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती , एखादी घटना घडली तर सर्व आप्तेष्ट, नातेवाईकांना माहीत व्हायला , निरोप पोहचायला उशीर व्हायचा. त्यामुळे विधी १०,१३,१४, दिवसांनी केले जात असत जेणेकरून सर्व आप्तेष्ट , नातेवाईक हजर राहु शकतील, परंतु आता साधनं उपलब्ध आहेत काही तासात निरोप पोहचुन आप्तेष्ट , नातेवाईक पोहचतात, पिंड दान करण्यासाठी साठी १० दिवस थांबण्याची गरज राहिली नसल्याचे डॉ गांगर्डे सांगतात. जवळची व्यक्ती गेल्यानंतर झालेल्या दु:खातुन सावरण्यासाठी , जर आपल्या दररोजच्या उद्योग, व्यवसाय , नोकरीत गुंतले तर दु:ख हलके होण्यास मदत होते. परंतु हि बाब सर्वांना पटत असुनही हा बदल करण्यास कोणी धजावत नाही .
तालुक्यातील कोंभळी येथील नेहमीच पुरोगामी विचार व कृतीतुन समाजाला मार्गदर्शक तत्वे अंगिकार केलेले डॉ. ज्ञानेश्वर गांगर्डे , सौ. मैनाबाई रविंद्र चौधरी , सौ.पुष्पाताई सुरेंद्र जासुद व जयश्रीताई बाळासाहेब कासार यांचे वडील स्मृतीशेष कै.तुकाराम आण्णा गांगर्डे यांचे बुधवार दि. १४ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराने निधन झाले .
डॉक्टर ज्ञानेश्वर गांगर्डे व त्यांच्या बहिणींनी वडिलांचे पिंड दान विधी पाचव्या दिवशी करण्याचा निर्णय घेऊन , पिंड दान विधी सुध्दा शिवधर्म पद्धतीने पंढरपूर येथील शिवभक्ती परायन शिवश्री भगवान महाराज बागल यांनी केले तसेच यानिमित्ताने बागल महाराजांचा प्रबोधन कार्यक्रम झाला .
स्मृतीशेष कै. कै.तुकाराम आण्णा गांगर्डे यांच्या अस्ती व रक्षा स्वतःच्या शेतात विसर्जित करुन त्याठिकाणी आंब्याचे झाड लावले आहे. वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ डॉ. ज्ञानेश्वर गांगर्डे यांनी स्वतःच्या मृत्यू पश्चात देहदानचा संकल्प केला आहे .
डॉक्टर ज्ञानेश्वर गांगर्डे व मैनाबाई ,पुष्पा व जयश्री यांच्या मातोश्री स्मृतीशेष कै. लक्ष्मीबाई तुकाराम गांगर्डे ( ताई ) यांचे सहा वर्षांपूर्वी दि. ११/०२/२०१८ रोजी निधन झाले त्या वेळी सुद्धा या भाऊ- बहिणींनी स्मृतीशेष कै. आण्णांच्या सम्मतीने आईचे पिंड दान विधी पाचव्या दिवशी, शिवधर्म पद्धतीने करुन शिवभक्ती परायन शिवमती सुनंदाताई भोस यांचे प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता तसेच आईंच्या अस्ती व रक्षा स्वतःच्या शेतात विसर्जित करुन त्याठिकाणी आंब्याचे झाड लावले आहे
आई स्मृतीशेष कै. लक्ष्मीबाई पुण्यतिथीला गावातील शाळेला देणगी देऊन आपली उपक्रमशिलता व सामाजिक बांधिलकी जपली आहे .
डॉ ज्ञानेश्वर गांगर्डे व मैनाबाई , पुष्पाताई व जयश्रीताईंचे सर्व समाजाने अनुकरण करणे गरजेचे आहे.