कृषी विभागात जे काही ऑनलाईन अर्ज येतात, त्याची १०-१० हजाराप्रमाणे लॉटरी सिस्टीम काढली जाते. आता मागेल त्याला शेततळे मिळणार. कारण शासन मागणाऱ्याला शेततळे देणार आहे. जो शेतकरी ड्रीप मागेल त्याला सरकार ड्रीप देणार आहे. यात कुठलीही लॉटरी सिस्टीम राहणार नाही. तीन लाख शेतकऱ्यांनी ड्रीप आणि शेततळ्याची मागणी केली आहे. मागणाऱ्या प्रत्येकाला ड्रीप आणि शेततळे द्यावे, असा निर्णय राज्याचे कृषीमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी घेतला.
हमीभावापेक्षा जास्त रक्कम मिळाली तर चांगली गोष्ट आहे. टमाटरबाबत काही जणांनी आंदोलन सुरू केली. काही मोठ्या अभिनेत्यांनी टमाटर खाल्ले नाही तर शरीरातील प्रोटीन व्हॅल्यू कमी होणार नाही. शेतकऱ्याला दोन पैसे जास्त पैसे मिळाले, तर वेगळं राजकारण होऊ नये, अशी माझी इच्छा असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.






