केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात जिवंत झाले महाभारतातील प्रसंग

0
54

केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात जिवंत झाले महाभारतातील प्रसंग
शिक्षक गोरगरिबांच्या पिढया घडवीत आहे -खा. निलेश लंके
नगर (प्रतिनिधी)- मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत असलेल्या मुलींची शाळा पाहून मला समाधान वाटले. मुलींसाठी असलेली शैक्षणिक संस्था इतकी मोठी असून, अनेक मुलींनी शिक्षण घेऊन आपले भवितव्य घडविल्याचा सर्वांना अभिमान वाटत आहे. महाराणी ताराबाईचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या या मुली आहेत. शिक्षक हे गोरगरिबांच्या पिढया घडविण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले.
केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी खासदार लंके बोलत होते. इंजिनियर प्रसाद आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव बबनराव कोतकर, संस्थेचे अध्यक्ष रमेश गवळी, उपाध्यक्ष जाफर शेख, खजिनदार प्रल्हाद साठे, रावसाहेब सातपुते, जयद्र्‌थ खाकाळ, डॉ. सुभाष बागले, जयश्री कोतकर, मनीषा थोरात, छाया सुंबे, ज्ञानदेव बेरड, नंदेश शिंदे, संजयकुमार निक्रड, मुख्याध्यापिका वासंती धुमाळ, सखाराम गारुडकर, रेणुका म्हस्के, भारती गुंड आदींसह सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे खासदार लंके म्हणाले की, या शाळेत शिक्षणाबरोबर मुलींच्या विविध कलागुणांना वाव दिले जात आहे. मुलींचा मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमात चांगला सहभाग असतो, याचे सर्व श्रेय शिक्षकांना जाते. चांगल्या दर्जाचे शिक्षण या ठिकाणी मिळत असून, गुणवंत मुली घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका वासंती धुमाळ यांनी अहवाल वाचन करुन विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला. शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींना निलेश लंके व प्रसाद आंधळे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कौतुकाबरोबर शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षकेतर कर्मचारी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाट्य व नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थिनींनी केले. स्नेहसंमेलनात महाभारतातील विविध प्रसंग सादर करण्यात आले होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचे सादरीकरण कार्यक्रमातून करण्यात आले. विद्यार्थिनींनी शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व महाभारत मधील विविध पात्र साकारले होते. उपस्थित प्रेक्षक व पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली. मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम दाखवणारा मूक अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले. सांस्कृतिक कार्यक्रमात पहिली ते बारवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनीनी सहभाग नोंदवून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रस्तावित बबन साळवे यांनी केले. सूत्रसंचालन जालिंदर सातपुते व जयश्री कोतकर यांनी केले. आभार सखाराम गारुडकर यांनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.