जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 महसूल मंडळांचा दुष्काळी यादीत समावेश…

0
104

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 गावांचा दुष्काळी यादीत समावेश केल्याची घोषणा केली आहे. या गावांमध्ये आता दुष्काळात राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनाचा लाभ मिळणार आहे.

मंत्रालयातील वॉर रुममध्ये मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 महसूल मंडळांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला आहे. यात नालेगांव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुईछत्तीशी, विरगाव, समशेरपूर, साक्रीवाडी, राजुर, शेंडी, कोतूळ, ब्राम्हणवाडा, अकोले, जामखेड, अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव, कर्जत, राशीन, भांबोरा, कंबोळी, मिरजगाव, माही, कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव बोलका, पोहेगाव, नेसावा खुर्द, नेवासा बुद्रूक, सतलबपुर, कुकाणा, चांदा, घोडेगाव, सोनई, वडाळा बहिरोबा, पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हान, वडझिरे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, पळशी, पाथर्डी, माणिकदौंडी.

टाकळी मानूर, करंजी, मिरी, राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, शिर्डी, राहुरी बुद्रूक, सात्रळ, ताहाराबाद, देवळाली प्रवरा, टाकळीमियॉ, ब्रॉम्हणी, वांबोरी, संगमनेर बुद्रूक, धांदरफळ बुद्रूक, आश्वी बुद्रूक, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळासणे, साकुर, पिंपरणे, शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एंरडगाव, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेनगाव, चिंबळा, देवदैठन, कोळेगाव, श्रीरामपूर, बेलापूर बुद्रूक, उंदिरगाव, टाकळीभान गावांचा समावेश आहे.