पन्नास वर्षे नगर जिल्ह्यात राजकारण करून सत्ता भोगली मग स्व. दिलीप गांधी यांनी बांधलेल्या *उड्डाणपुलाच्या कामावर डॉ सुजय विखे मत का मागतात ?
नितीन भुतारे यांचा सुजय विखे यांना मोठा सवाल*
पन्नास वर्ष विखे घराण्याने नगर जिल्ह्यात राजकारण करून स्वतःसाठी सत्ता भोगली
लोकसभा निवडणूक सुरू झाली प्रचार सुरू झाला या प्रचारात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील हे प्रत्येक प्रचारात मी उड्डाण पूल बांधला आयुष हॉस्पिटल बांधले या दोन कामावराच मतदान मागत आहेत. तसे पाहिले तर हे दोन्ही कामे स्व. खा दिलीप गांधी यांनी केले या कामाच्या प्रस्तवापासून ते निविदा प्रक्रिया होई पर्यंत स्व खा दिलीप गांधी हे पाठपुरावा करत होते त्यांच्यामुळे हे उड्डाण पूल आणि आयुष हॉस्पिटल उभे राहिले असे आपल्या भाषणातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले तरी देखील लोकांची दिशाभूल करून हे काम मीच केले असे खा डॉ सुजय विखे जनतेला सांगत आहेत पन्नास वर्षे विखे पाटील घराण्याने नगर जिल्ह्यात सत्ता भोगली हे सर्व जनतेला माहीत आहे जनतेचे विखे घराण्यावर प्रेम आहे असे असताना
पन्नास वर्षे विखे पाटील घराण्यांनी सत्ता भोगली मग स्व दिलीप गांधी यांनी केलेल्या उड्डाण पुलाच्या कामावर कामावर तुम्ही मत का मागतात असा सवाल युवा नेते नितीन भुतारे यांनी खा डॉ सुजय विखे यांना केला आहे.
पन्नास वर्षे विखे पाटील यांच्या घराणे सत्ता भोगली आहे असे खा डॉ सुजय विखे सांगतात मग त्यांनी त्या पन्नास वर्षातील एकही कामाचा उल्लेख नाही करत मग पन्नास पन्नास वर्षे विखे घराण्याने राजकारण करून फक्त जनतेची दिशाभूल केल्याची दिसते त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत जनतेने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे असा आरोप नितीन भुतारे यांनी केला