जिल्ह्यात चारा छावणी सुरु कराव्यात, गोसेवा महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
13

अहमदनगर जिल्ह्यात चारा छावणी सुरु कराव्यात
गोसेवा महासंघ ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
नगर-अहमदनगर जिल्ह्यात पाणी व चाऱ्याची टंचाई सुरु झाली असून त्यासाठी चारा छावणी सुरु कराव्यात अशी मागणी आज गोसेवा महासंघानी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.आज जिल्हातील गोशाळा चालक नगर मध्ये येऊन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील याना निवेदन देऊन चर्चा केली यावेळी जिल्ह्यातील विविध गोशाळेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये गौतम कराळे, ललित चोरडिया,दीपक महाराज काळे,शिवनाथ दगडखैर,संजय नेवासकर,रवींद्र महाराज सुद्रिक,माउली शिर्के,प्रशांत भापकर,मिलिंद राऊत ,विश्वास बेरड पा ,महेश बेरड,विष्णू कुलकर्णी,अथर्व सप्तर्षी,हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडोळे आदीसह अनेक जण उपस्थित होते
निवेदनात म्हटले आहे आपणास विनंती करण्यात येते की मार्च महिना संपलेला आहे,चालू वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाणी टंचाई चारा टंचाई आहे,आपण आपल्या यंत्रणेमार्फत त्याचे संरक्षण केलेले आहे. गोशाळेत भाकड जनावरांची संख्या अतिशय तीव्र वाढत आहे,चारा आणि पाणी देणे हे शासनाचे काम आहे,सध्या संपूर्ण भारतात निवडणूक असल्यामुळे पुढारी आणि मतदार निवडणूक गुंतलेले आहेत,अजून चार महिने जायचे आहेत. आपल्याला कायद्याने तो अधिकार आहे
कृपया आपण सत्वर प्रस्ताव पाठवून सात दिवसाच्या आत संपूर्ण नगर जिल्ह्यात चारा छावणी,चारा डेपो चालू करावेत लोकप्रतिनिधीमार्फत हा निर्णय आचारसंहितेमध्ये गुंतलेल्या असल्यामुळे होणार नाही. कृपया आपण त्वरित निर्णय घ्यावा ही विनंती असेही निवेदनात म्हटले आहे
यावेळी चर्चेत गोशाळा चालक म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात ८० गोशाळा आहेत.त्यांना कोणतेही अनुदान नाही,गुजरात,उत्तर प्रदेश,राजस्थान येथे एका जनावराला दर दिवशी ५० रु अनुदान मिळते,राज्यात तसे मिळत नाही,प्रशासनाचे काम या गोशाळा करतात,पोलीस लोक कसयाकडून जनावरे पकडल्यावर जवळच्या गोशाळेत पाठवतात. त्याची आर्थिक कुवत,तिथे जागा आहे का हेही पाहत नाही तरीही लोकांच्या देणगीतून या गोशाळा चालवल्या जातात.गोरक्षक वाचवण्याचे काम करतात तर गोसेवक सांभाळण्याचे काम करतात तरी मागणीचा विचार करावा असे गोसेवक म्हणाले